कंपनी शाळा विधेयक पास ! शिक्षक , पदवीधर अामदार नापास !!

कंपनी शाळा विधेयक पास ! शिक्षक , पदवीधर अामदार नापास !!
शाहू , फुले , अांबेडकर , कर्मवीर भाऊराव पाटील ,  डाॅ. पंजाबराव देशमुख , बापुजी साळुंखे या महात्म्यांनी अापल्या देशातील बहुजन समाजातील गोरगरीब जनता शिक्षित झाली पाहिजे यासाठी संपुर्ण जीवण अर्पण केले.त्यांनी निर्माण केलेली शिक्षण व्यवस्था उध्दवस्त करण्याचा डाव हे शासन करत अाहे. ग्रामीण भागातील शासकीय शाळा बंद करण्याचा घाट या शासनाने घातला अाहे. कंपनी शाळा विधेयक हे गोरगरीब व अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अत्यंत घातक ठरणार अाहे. कारण कार्पोरेट कंपण्यांच्या खाजगी शाळांमध्ये विनामुल्य शिक्षण मिळणारच नाही. शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली होणारच. कंपनी शाळांमुळे होणार्‍या शिक्षणाच्या बाजारीकरणातून शासनाचे शिक्षणाविरोधी कार्पोरेट धोरण जनसामान्यांच्या मुळावर अाघात करणारे अाहे.

Comments